dcsimg
Image of East African copal
Life » » Plants » » Dicotyledons » » Legumes »

East African Copal

Hymenaea verrucosa Gaertn.

मादागास्कर कोपल (वनस्पती) ( Marathi )

provided by wikipedia emerging languages

मादागास्कर कोपल हा साधारण २५-४० फुटाचा छोटासा पण पसरलेला 'पूर्व आफ्रिकी कोपल' वृक्ष आहे. गुलमोहर, बहावा यांच्या कुळातील हा वृक्ष संयुक्तपर्णी आहे. दोनच पर्णिका असलेले पान आणि त्या पर्णिकांवरील शिरा उठून दिसतात. या शिरा व्हेरिकोज व्हेन्स॒सारख्या दिसत असल्यामुळे याचे शास्त्रीय नाव 'हायमोनिया व्हेरिकोज' असे आहे.

 src=
Hymenaea verrucosa MHNT.BOT.2012.10.2

मुळचा हा वृक्ष मादागास्कर-सेशेल्स बेटावरचा असून तिथून त्याचे स्थलांतर आफ्रिकेच्या पूर्ण किनाऱ्यावरील देश म्हणजे केनिया, टांझानिया, मोझांबिक आणि झांजीबार येथे झाले. साधारण सप्टेंबर मध्ये या वृक्षाची पांढरी-हिरवट रंगाची फुले फुलून येतात आणि ती शोभून दिसतात. भारतातातील उद्यानांमध्ये हा वृक्ष एकट्या-दुकट्या स्वरुपात आढळतो.

 src=
Hymenaea verrucosa Taub77c
license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक