गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिचा वेल असतो. गुंजेची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. (एक गुंज=तोळ्याचा ९६वा भाग). गुंजेत दोन जाती आहेत. एक पांढरी व दुसरी लाल. पांढऱ्या गुंजेची मुळे व पाला औषधात वापरतात. धर्म- गुंजेच्या मुळाची क्रिया जेष्ठमधासारखी होते.पाल्याचे धर्म मुळासारखे आहेत. मधुर, स्नेहन,कफशामक, मूत्रजनन आणि व्रणरोपण. उपयोग- जेष्ठमधाच्या ऐवजी गुंजेची मुळे वापरतात. खोकला व मूत्ररोगात प्रयोजक औषधाबरोबर मूळ देतात. पाला वाटून व्रणशोथावर व व्रणावर बांधल्याने थंडाई येऊन शोथ कमी होतो व व्रण रुजतो. स्वप्नभंगात पाल्याची गोळी तोंडात धरतात. याचा वापर वशीकरण केला जातो

संस्कृत- काकाणन्तिका, काकणन्ती, काकादनी, गुंजा, चिरिहिण्टिका, रक्तिका हिंदी- गुंज, गुंजा, घुंगची, घुंघची, चिरमिटी, माषा, रति बंगाली- कुंच कानडी- गुंजा, मधुका, हागा,गुळगंती गुजराती- चनोरी, गुंज मलयाळम-कुन्नि मराठी- गुंज, रती तामिळ- तेलगू-गुरिगिंज नेपाळी- मस्वतः उर्दू- खाक्शी इंग्रजी- Crab's Eye, Indian Liquorice/Indian Licorice लॅटिन- Abrus precatorius L.