dcsimg
Image of Redtail tegus
Life »

Animals

Metazoa

प्राणी ( Marathi )

provided by wikipedia emerging languages
 src=
प्राण्यांमधील विविधता

प्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणांसाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत. सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी अन्न मिळवावे लागते. अन्न प्राशन करणे आणि प्राशन केलेल्या अन्नातून आवश्यक गोष्टी निघून गेल्यावर त्याज्य द्रव्ये टाकून देणे ही पण सजीव असण्याची ओळख आहे.यात समागम होते.

वनस्पतीसृष्टी (वानसकोटी, Plant Kingdom) आणि प्राणीसृष्टी (प्राणीकोटी Animal Kingdom) असे सजीवांचे दोन मोठे वर्ग (कोटी) होतात. या दोन्ही कोटीमध्ये परिसंघ (Phylum), परिवर्ग (Class), श्रेणी (Order), कुल (Family), गोत्र (Genus), जाती (Specie), उपजाती (Sub specie) असे विभाग क्रमाने येतात.

प्राणीसृष्टीत खालील दहा परिसंघ आहेत :-

license
cc-by-sa-3.0
copyright
विकिपीडियाचे लेखक आणि संपादक